मेहरुणमध्ये तलवारीच्या धाकावर दहशत : आरोपी जाळ्यात


जळगाव स्थानिक गुन्हे शाखेची कामगिरी

जळगाव : मेहरुण भागातील नाथवाड्यात कृष्णा कैलास नाथ (23, रा.नाथवाडा, मेहरुण, जळगाव) घरासमोर हातात तलवार घेवून दहशत निर्माण करीत असताना जळगाव स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने त्यास अटक केली. गुरुवारी दुपारी पावणेदोन वाजता ही कारवाई करण्यात आली. आरोपीविरुद्ध जळगाव एमआयडीसी पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला. दरम्यान, आरोपीच्या ताब्यातून जप्त केलेली तलवार 3 फूट लांबीची स्टीलची अससून पात्याची लांबी दोन फूट पाच इंच व रुंदी 04 से.मी. इतकी आहे.

यांनी केली कारवाई
ही कारवाई पोलिस अधीक्षक डॉ.पंजाबराव उगले, अपर पोलीस अधीक्षक भाग्यश्री नवटके, सहा.पोलीस अधीक्षक डॉ.नीलाभ रोहन यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक बापू रोहोम यांच्या नेतृत्वात हवालदार शरद भालेराव, रामकृष्ण पाटील, गफूर तडवी, प्रमोद लाडवंजारी, महेश महाजन यांच्या पथकाने केली.


कॉपी करू नका.