बोदवडच्या माहेरवासीणीसह पतीचाही अपघाती मृत्यू


वलसाडजवळ पुलावरून कार कोसळल्याने दाम्पत्य ठार

बोदवड : बोदवड येथील माहेर असलेल्या विवाहितेचा पतीसह मृत्यू झाला. वलसाडजवळ पुलावरून कार कोसळल्यानी ही घटना घडली. हेमल गादिया व नम्रता गादिया असे मृत दाम्पत्याचे नाव आहे. यातील महिलेचे माहेर बोदवड येथील आहे. 25 रोजी पहाटे दोनला ही घटना घडली. बोदवड शहरातील कापड व्यापारी असलेले प्रफुल्ल बुगडी यांची लहान मुलगी नम्रता हिचा विवाह गेल्या आठ महिन्यांपूर्वी गुजरात राज्यातील वलसाड येथील हेमल गादिया शहा (वय 27) यांच्यासोबत झाला होता. बुधवार, 25 रोजी पहाटे दोन वाजता हेमल हे पत्नी नम्रता (वय 24) हिच्यासोबत घरी वलसाड येथे परतत होते. तेव्हा त्यांच्या कारला अपघात होऊन कार पुलावरून खाली कोसळली. त्यात दोघे पती-पत्नी जागीच ठार झाले.


कॉपी करू नका.