लग्नाच्या आमिषाने तरुणीवर अत्याचार


पिंपरी : ओळखीचा फायदा घेऊन लग्नाचे अमिष दाखवून तरुणीवर वारंवार अत्याचार केले. ही घटना जुलै 2018 ते जुन 2019 या कालावधीत भोसरी येथे घडली. याप्रकरणी 24 वर्षीय तरुणीने भोसरी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार, अक्षय बापुसो पाटील (25, सोनाळी, ता.कागल, जि. कोल्हापूर) याच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी आणि आरोपी हे एकमेकांच्या ओळखीचे आहेत. ओळखीचा फायदा घेत आरोपीने तरुणीसोबत प्रेमाचे संबंध प्रस्थापित केले. तिला लग्नाचे अमिष दाखवून तिच्यावर वारंवार अत्याचार केला. तरुणीने लग्नाबाबत विचारणा केली असता, उडवाउडवीची उत्तरे दिली तसेच लग्नाला नकार दिला.


कॉपी करू नका.