गावठी कट्ट्यांसह 16 जिवंत काडतूस जप्त : दोघा आरोपींना अटक
अक्कलकुवा : शहरातील बसस्थानकामागील श्रीराम नगर जवळील नदी काठावर अवैध हत्यारांची देवाण-घेवाण होणार असल्याची माहिती पोलिसांना मिळाल्यानंतर पोलिसांनी सापळा रचत आरोपी राजूसिंग शिखलिकर तसेच कैलास नाईक यांना नुकतीच अटक केली. आरोपींच्या ताब्यातून 55 हजारांच्या दोन गावठी पिस्टलसह दोन हजार शंभर रुपये किंमतीचे 16 जिवंत काडतूस जप्त करण्यात आले तसेच आरोपी राजूसिंग शिखलिखर यांच्या घराची झडती घेतल्यावर दोन हजार 500 रुपये किमतीच्या पाच लोखंडी तलवार जप्त करण्यात आल्या. पोलिस नाईक विजय विसावे यांचा फिर्यादीवरुन अक्कलकुवा पोलिस ठाण्यात आरोपींविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला.
यांनी केली कारवाई
पोलिस उप अधीक्षक संभाजी सावंत, वरीष्ठ निरीक्षक राजेश शिंगटे, सुरेश चौधरी, ज्ञानेश्वर बडगुजर, रुपाली महाजन, पोलिस हवलदार मोहन शिरसाठ, पोलिस नाईक अमोल खवळे, विजय विसावे, संजय सूर्यवंशी, नीलेश वसावे, अंकुश गावीत, देवीदास विसपुते, पोलिस शिपाई सतीश वळवी, गिरीश सांगळे, प्रशांत यादव, पोलिस कॉ. धनंजय धनगर, आदिनाथ गोसावी, अश्विन ठाकरे, अविनाश रंगारे, अजय पवार, दीपक पाटिल, शरद पाटील आदींनी ही कारवाई केली. तपास सहाय्यक पोलिस निरीक्षक सुरेश चौधरी करीत आहेत.


