भुसावळात हॉटेलवर वृद्धाचा मृत्यू
भुसावळ- हॉटेल चाहेल पंजाबवर गेल्या वर्षभरापासून राहत असलेल्या ओम प्रकाश शर्मा (75) यांचे गुरूवारी सायंकाळी निधन झाले. शर्मा यांना गुरूमितसिंग चाहेल हे चहा देण्यास गेले असता त्यांनी काहीही हालचाल केली नाही. त्यांच्या खबरीनुसार बाजारपेठ पोलिस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली. हवालदार जयेंद्र पगारे पुढील तपास करीत आहे.