मुक्ताईनगर कडकडीत बंद ; यावलमध्ये निषेध


विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर शरद पवार यांना अडकवण्याचे षडयंत्र : भुसावळ विभागात राष्ट्रवादी पदाधिकारी आक्रमक

भुसावळ- राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा तथा खासदार शरद पवार यांच्यावर ईडीने शिखर बँक प्रकरणात दाखल केलेल्या गुन्ह्याचे पडसाद सलग तिसर्‍या दिवशीही भुसावळ विभागात उमटले. शुक्रवारी मुक्ताईनगरात राष्ट्रवादीने शहर बंदची हाक दिल्यानंतर व्यापार्‍यांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला तर काँग्रेसनेही तहसीलदार प्रशासनाला निवेदन देवून भाजपा सरकारचा निषेध केला. यावल शहरातील राष्ट्रवादी काँग्रेसनेेही गुन्हा दाखल झाल्याच्या बाबीचा निषेध करीत प्रांताधिकार्‍यांना निवेदन दिले.

यावलमध्ये प्रांताधिकार्‍यांना निवेदन
यावल- राष्ट्रवादीने प्रांताधिकार्‍यांना निवेदन दिले. महाराष्ट्र राज्य सहकारी बँकेतील कथीत गैरव्यवहारामध्ये शरदचंद्र पवार यांचा कोणताही प्रत्यक्ष किंवा अप्रत्यक्ष कोणताही सहभाग नाही मात्र सदरील गैरव्यवहारात आरोप असलेल्या व्यक्ती या त्यांच्या विचारांच्या असल्याच्या तुटपुंज्या कारणावरून व कोणतेही सबळ कारण व पुरावे नसतांना पवार यांच्याविरुद्ध खोटा गुन्हा नोंदविण्यात आला. मागील पाच वर्षात कोणतीही कारवाई न करता ऐन विधानसभा निवडणुकीच्या काळात खोटा गुन्हा नोंदवून त्यांना हेतूपुर्वक लक्ष्य केले जात आहे. या सर्व प्रकरणी ईडी व इतर यंत्रणांचा सोयीप्रमाणे वापर करून दडपशाहीचा मार्ग अवलंबण्याचा प्रकार सुरू आहे. त्यातुनच असे खोटे गन्हे नोंदविण्यात येत आहेत. याचा यावल तालुका राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी तीव्र विरोध करून निषेध नोंदवित असल्याचे यात म्हटले आहे. संबंधीत निवेदन प्रांताधिकारी कार्यालयात अव्वल कारकुन महेश साळुंखे यांना देण्यात आले.

यांची होती उपस्थिती
यावलमध्ये निवेदन देताना राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे तालुकाध्यक्ष मुकेश येवले, बाजार समितीचे माजी उपसभापती दिनकर पाटील, विजय पाटील, जिल्हा संघटक सईद शेख, राष्ट्रवादी काँग्रेसचे फैजपूर शहराध्यक्ष अन्वर खाटीक, यावल शहराध्यक्ष करीम मण्यार, आदिवासी जिल्हाध्यक्ष एम.बी.तडवी, युवक तालुकाध्यक्ष देवकांत पाटील, फैजपूर उपनगरध्यक्ष रशीद तडवी, शेख, शाकीर, कौसर अली सैय्यद, बारसू नेहते, नीळकंठ फिरके, किसान सेल तालुकाध्यक्ष वसंत पाटील, मनोहर झांबरे, रेखा पारधे, माजी सरपंच विकास पाटील, गणी शेख, बाळ जासुद, सद्दाम मण्यार, मतीन मलिक, अशोक भालेराव, संजय वाघुळदे आदी पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.

मुक्ताईनगर शहर कडकडीत बंद
मुक्ताईनगर- राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष खासदार शरद पवार यांच्यावर महाराष्ट्र सहकारी बँक घोटाळ्याप्रकरणात कुठलाही संबंध नसताना भाजपा सरकारने दबाव तंत्राचा वापर करून गुन्हा दाखल केल्याच्या निषेधार्थ शुक्रवारी राष्ट्रवादीने मुक्ताईनगर शहर बंदचे आवाहन केल्यानंतर या आवाहनाला शहरातील व्यापार्‍यांनी उत्स्फूर्त प्रतिसाद देत प्रतिष्ठाने बंद ठेवली. शहर आणि तालुक्यातील कार्यकर्त्यांनी मुक्ताईनगर शहरातील परीवर्तन चौकात गर्दी केली. गुरुवारी बाजारपेठेत फिरून राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष अ‍ॅड.रवींद्र पाटील व कार्यकर्त्यांनी व्यापार्‍यांनी गुरुवारी प्रतिष्ठाने बंद ठेवण्याचे आवाहन केल्यानंतर या आवाहनाला व्यापारी मंडळींनी सकारात्मक प्रतिसाद देत शुक्रवारी आपापली दुकाने बंद ठेवली.

यांची होती उपस्थिती
यावेळी जिल्हाध्यक्ष अ‍ॅड.रवींद्र पाटील, तालुकाध्यक्ष यु.डी.पाटील, अंतरावर देशमुख, विजय सोनार, सोपान दुट्टे, सुभाष पाटील, पवनराजे पाटील, लीलाधर पाटील, महिला आघाडी अध्यक्ष लताताई पाटील, सईद खान, शेषराव पाटील, अशोक चौधरी, रघुनाथ सापधरे, सोनु पाटील, श्रीराम चौधरी, शरीफ तडवी, धनराज मोरे, अशोक नाईक आदी पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.


कॉपी करू नका.