भुसावळ विधानसभा निवडणूक : पहिल्याच दिवशी 28 इच्छुकांनी नेले अर्ज


भाजपा सेनेसह अपक्षांची भाऊगर्दी : 4 ऑक्टोबरपर्यंत अर्ज भरता येणार

भुसावळ : विधानसभा निवडणुकीची शुक्रवारी अधिसूचना प्रसिद्ध झाल्यानंतर प्रत्यक्षात उमेदवारी अर्ज भरण्यासह अर्ज वाटप करण्याच्या प्रक्रियेला सुरुवात झाली. शहरातील तहसील कार्यालयातून पहिल्याच दिवशी तब्बल 27 इच्छुकांनी 28 उमेदवारी अर्ज नेल्याची माहिती सूत्रांनी दिली. भाजप-सेनेसह अपक्षांनी अर्ज नेण्यासाठी भाऊगर्दी केल्याचे दिसून आले. दरम्यान, 4 ऑक्टोबरपर्यंत उमेदवारांना उमेदवारी अर्ज दाखल करता येणार आहे.

27 इच्छुकांनी नेले 28 अर्ज
उमेदवारी अर्ज वाटपाला शुक्रवारपासून सुरुवात झाल्यानंतर पहिल्याच दिवशी 27 इच्छूकांनी 28 अर्ज नेले. भाजपातर्फे इच्छूक असलेल्या डॉ.मधु राजेश मानवतकर यांनी अर्ज नेला असलातरी राजकीय पक्षाच्या रकाण्यात मात्र कुठल्याही पक्षाचा उल्लेख केला नाही तर सायंकाळी मात्र पुन्हा त्यांनी अर्ज घेत पक्षाच्या रकाण्यात भाजपाचा उल्लेख केला तसेच भाजपातर्फे लक्ष्मण कौतीक सोयंके, प्रभाकर सुधाकर जाधव व प्रशांत सुकदेव निकम, शिवसेनेतर्फे निलेश अमृत सुरडकर व गीता प्रशांत खाचणे तसेच निलेश राजूदेव घाटोळे, विजय भास्कर सुरवाडे, काँग्रेसतर्फ अंजु गुलाम मोहम्मद, रीपाइं सोशलतर्फे संजयकुमार लक्ष्मण वानखेडे,, आरपीआयतर्फे पुरूषोत्तम मधुकर सुरळकर तसेच राष्ट्रवादीतर्फे सतीश भिका घुले व अपक्ष म्हणून राहुल शामराव इंगळे, अरुण चंद्रभान तायडे, दिलीप पंढरी सुरवाडे, प्रवीण नाना सुरवाडे, प्रवीण गौतम मेघे, अ‍ॅड.कृष्णा डिगंबर तायडे, राजेश रमेश इंगळे, छोटेलाल हरणे, जानकीराम प्रल्हाद सपकाळे व अशोक चुडामण ठोसर, वंचित बहुजन आघाडीतर्फे रवींद्र बळीराम सपकाळे,  सोनल रवींद्र सपकाळे, महेंद्र बळीराम सपकाळे, डॉ.महेंद्र नारायण शेजवळकर, इंडियन मुस्लीम लीगतर्फे कैलास गोपाळ घुले या इच्छूकांनी अर्ज नेल्याचे सूत्रांनी सांगितले.

असा आहे निवडणूक कार्यक्रम
27 पासून अर्ज वाटप व स्वीकृत तर 4 ऑक्टोबर हा उमेदवारी अर्ज दाखल करण्याचा अखेरचा दिवस असणार आहे. शनिवार, 28 रोजी अमावस्या व त्यानंतर रविवारची आलेली सुटी व पुन्हा 2 ऑक्टोबर रोजी महात्मा गांधी जयंतीची सुटी असल्याने केवळ चार दिवस अर्ज दाखल करण्यासाठी मिळणार आहेत. 5 ऑक्टोबर रोजी उमेदवारी अर्जाची छाननी होईल तसेच 7 ऑक्टोबरपर्यंत माघार घेता येईल तर 21 रोजी मतदान व 24 ऑक्टोबर रोजी मतमोजणी होईल.


कॉपी करू नका.