वरणगाव नगराध्यक्ष सुनील काळे यांच्यावर वाढदिवसानिमित्त शुभेच्छांचा वर्षाव

भुसावळ : वरणगाव नगराध्यक्ष सुनील काळे यांच्यावर वाढदिवसानिमित्त शुभेच्छांचा वर्षाव करण्यात आला. भोगावती नदी पार्कवर विराट सभा झाली. प्रसंगी काळे यांची लाडू तुला करण्यात आली तर कार्यकर्त्यांनी त्यांचा तलवार देवून गौरव केला.
यांची होती उपस्थिती
सभेत उपनगराध्यक्ष शेख अखलाक, माजी सभापती राजेंद्र गुरचळ, भाजपा शहराध्यक्ष सुनील माळी, हाजी अल्लाउद्दीन सेठ, नगरसेविका माला मेढे, नसरीन बी.साजीद कुरेशी, मेहनाजबी इरफान पिंजारी, ग्रामपंचायतीच्या माजी सदस्य रुक्मिणी काळे, अजय पाटील, ज्ञानेश्वर घाटोळे, शामराव धनगर, संजय जैन, प्रदीप भंगाळे, नामदेव पहेलवान यांच्यासह असंख्य मान्यवरांची उपस्थित होती.
मान्यवरांनी केला कार्याचा गौरव
ग्रामपंचायतीचे माजी सदस्य अजय पाटील यांनी नगराध्यक्ष सुनील काळे यांच्या कार्याचा गौरव केला. संजय जैन, नामदेव पेहलवान, माजी सरपंच शेख सईद यांनी मनोगत व्यक्त केले.
सूत्रसंचालन सचिन मेथाळकर तर आभार ज्ञानेश्वर घाटोळे व शामराव धनगर यांनी मानले. यशस्वीतेसाठी कुंदन माळी, तेजस जैन, शंकर पवार, हितेश चौधरी, कैलास पाटील, आकाश निमकर, प्रशांत मोरे, विक्की चांदेलकर, नरेंद्र बावणे, संजय सोनार, संदीप माळी, अनंता माळी यांच्यासह शेकडो कार्यकर्ते उपस्थित होते.




