महिलांनी संघटीत होऊन समाजासाठी योगदान द्यावे


अरुंधती शिरसाठ : भारीप बहुजन महासंघाचा महिला मेळावा

मुक्ताईनगर : जगभरात महिला आपल्या कर्तत्वातून कार्याचा ठसा उमटवत असून महिला संघटीत झाल्या तर समाजाचा विकास झपाट्याने होईल त्यासाठी महिलांनी संघटीत होऊन समाजासाठी कार्य करावे, असे आवाहन महिला आघाडीच्या राज्य संघटक अरुंधती शिरसाठ यांनी येथे केले. भारीप बहुजन महासंघाच्या रावेर लोकसभा महिला आघाडीतर्फे महिला मेळावा मुक्ताईनगरमधील जैस्वाल लॉन्समध्ये झाला. याप्रसगी शिरसाठ बोलत होत्या.

यांची होती मेळाव्याला उपस्थिती
भारीप बहुजन महासंघ महिला आघाडीच्या जिल्हाध्यक्षा छाया सावळे मेळाव्याच्या अध्यक्षस्थानी होत्या. जिल्ह्यातील महिला मेळाव्यासाठी आवर्जून उपस्थित होत्या. प्रसंगी अकोला जिल्हा परीषदेच्या माजी शिक्षण सभापती वंदना वासनिक, भारीप बहुजन महासंघाचे उपाध्यक्ष शरद वसतकर, पुणे सदस्य रोहिणी टेकाळे, विनोद सोनवणे, बाळाभाऊ पवार, संगीता भांबरे, अ‍ॅड.विनोद इंगळे, डॉ.स्नेहल सावळे, वंदना सोनवणे आदींची उपस्थिती होती.


कॉपी करू नका.