धुळ्यात भंगार व्यापार्‍याला लूटले : पाच लाखांची रक्कम लांबवली


धुळे : शहरात भंगार व्यापार्‍याकडील सुमारे पाच लाखांची रोकड असलेली बॅग लुटारूंनी लांबवत पोबारा केला. गुरुवारी रात्री 11.30 वाजता चाळीसगाव रोडवरील कनोसा हायस्कूलजवळ ही घटना घडली. आझाद नगर पोलिसात याप्रकरणी तिघांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला. भंगार स्क्रॅप व्यावसायीक साबीर उस्मान खाटीक (33) हे सुमारे पाच लाखांची रोकड घेवून शहरात आले असता पायीच गफूर नगरकडे निघाले असता चाळीसगाव चौफुलीजवळ दुचाकीवरून आलेल्या तिघांनी त्यांच्याइ हातातील रोकड असलेली बॅग हिसकावून पोबारा केला. दरम्यान, सीसीटीव्हीच्या आधारावरून संशयीताचा शोध घेतला जात आहे.




मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !