भुसावळातील श्री राधाकृष्ण प्रभातफेरीच्या सहावा वार्षिकोत्सवानिमित्त विविध कार्यक्रम


भुसावळ- शहरातील श्री राधाकृष्ण प्रभातफेरीच्या सहावा वर्धापन दिनानिमित्त विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले. प्रोफेसर कॉलनीतील शर्मा हॉस्पीटल परीसरात 50 वृक्ष लावण्यात आले त्यानंतर व्यंकटेश बालाजी मंदीरात भजन संध्या कार्यक्रम झाला. सायंकाळच्या कार्यक्रमात राधा-कृष्णावर आधारीत भजन गाण्यात आले तसेच नृत्याचा कार्यक्रम झाला.

यांची होती उपस्थिती
आमदार संजय सावकारे, राधेश्याम लाहोटी, नगरसेवक मनोज बियाणी, बियाणी एज्युकेशनच्या सेक्रेटरी संगीता बियाणी, सामाजिक कार्यकर्ते जे.बी.कोटेचा, रेल्वेचे सेवानिवृत्त वाणिज्य निरीक्षक जी.आर.ठाकूर, डॉ.शर्मा, नगरसेवक अ‍ॅड.बोधराज चौधरी, वीणा लाहोटी, शशी लाहोटी, श्यामा लढ्ढा, रसीला पटेल, निर्मला चौधरी, कृष्णा भराडीया, राज भराडीया, साधना शर्मा, प्रिया अग्रवाल, सुनील लाहोटी, जगदीश शर्मा यांच्यासह इतरांची उपस्थिती होती. मान्यवरांचे आभार राधेश्याम लाहोटी यांनी मानले या नंतर महाप्रसाद वाटण्यात आला.


कॉपी करू नका.