माजी उपमुख्यमंत्री अजित पवारांच्या राजीनाम्याने खळबळ


विधानसभा अध्यक्षांकडे सोपवला राजीनामा

मुंबई : विधानसभेची मुदत संपायला थोडाच अवधी असताना माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी शुक्रवारी आपल्या आमदारकीचा राजीनामा दिल्याने राजकीय क्षेत्रात प्रचंड खळबळ उडाली आहे. विधानसभेचे अध्यक्ष हरिभाऊ बागडे यांच्या मुंबई येथील कार्यालयात त्यांनी तो सुपूर्त केल्याचे सांगण्यात आले. बागडे यांनी हा राजीनामा स्वीकारल्याचे सांगितले आहे. दरम्यान, अजित पवारांच्या राजीनाम्यावर शरद पवार यांची रात्री आठ वाजता पत्रकार परिषद घेणार असल्याची माहिती राष्ट्रवादीचे प्रवक्ते अंकुश काकडे यांनी दिली.

तासाभरापूर्वीच मानले होते आभार
दरम्यान, काही तासापूर्वीच त्यांनी शरद पवार यांना शुक्रवारीदिलेल्या पाठिंब्याबद्दल आभार मानले आहेत. मुंबईत आदरणीय शरद पवार साहेबांना मोठ्या संख्येनं मिळालेला चाहत्यांचा भक्कम पाठिंबा अभूतपूर्व आहे. राष्ट्रवादीचे पदाधिकारी, कार्यकर्त्यांचे मनापासून आभार! राजकीय हेवेदावे असले तरी, सत्याला साथ देण्यासाठी विरोधकही पुढे आले. हाच आदर,दृढ विश्वास कायम साहेबांसोबत राहील,याची खात्री आहे, असे ट्वीट अजित पवार यांनी केले होते.



मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !