प्रेमी युगुलाची विहिरीत उडी घेवून आत्महत्या
साक्री : तालुक्यातील धाडणे येथे प्रेमी युगुलाने सोबतच विहिरीत आत्महत्या केली. शनिवारी ही घटना उघडकीस आली. मोहन दीपक भदाणे (20) व दीपाली युवराज ठाकरे (18) अशी मयतांची नावे आहे. दोघांच्या लग्नाला कुटुंबीयांचा विरोध असल्याने दोघांनी आत्महत्येचा पर्याय स्वीकारला. गावाशेजारी असलेल्या विहिरीत उडी घेत दोघांनी आत्महत्या केली. याप्रकरणी साक्री पोलिसात मृत्यूप्रकरणी नोंद करण्यात आली.

