अडीच लाखांची लाच मागणी भोवली : सार्वजनिक बांधकाम विभागाचे अभियंते जाळ्यात
धुळे : अमळनेर येथील सार्वजनिक बांधकाम विभागाच्या दोन अभियंत्यांना धुळे येथील लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकाने अडीच लाखांच्या लाच मागणी प्रकरणात अटक केल्याने सार्वजनिक बांधकाम विभागाच्या वर्तुळात मोठी खळबळ उडाली आहे. उपविभागीय अभियंता दिनेश पाटील व कनिष्ठ अभियंता सत्यजीत गांधलीकर अशी अटकेतील आरोपींची नावे आहेत. अमळनेर तालुकयातील आदिवासी वस्तीगृहाच्या बांधकामाचे जुने बिल काढण्यासाठी आरोपींनी तक्रारदाराकडे दोन लाख 58 हजारांची लाच मागितली मात्र लाच स्वीकारण्यात आली नसलीतरी लाच मागितल्याचे सिद्ध झाल्याने धुळे एसीबीच्या पथकाने आरोपींविरोधात अमळनेरात गुन्हा दाखल करून त्यांना अटक केली आहे.
यांच्या पथकाने आवळल्या आरोपींच्या मुसक्या
धुळे एसीबीचे पोलीस उपअधीक्षक सुनील कुर्हाडे, निरीक्षक प्रकाश झोडगे, मंजीतसिंग चव्हाण व सहकार्यांनी दोघा आरोपींना अटक केली.


