चाळीसगावात वीज धक्क्याने तरुणाचा मृत्यू

चाळीसगाव- शहरातील आनंदवाडी भागातील गौतम नाना जाधव (34) या तरुणाचा विजेचा धक्का लागल्याने मृत्यू झाल्याची घटना शनिवारी पहाटे सहा वाजता घडली. घरात काम करीत असताना गौतम जाधव यांना विजेचा धक्का लागल्याने त्यांचा मृत्यू ओढवला.




