भुसावळात तलवारीच्या धाकावर दहशत : कुविख्यात शेख कलीम जाळ्यात

भुसावळ- शहरातील जामनेर रोडवरील हेवन हॉटेलसमोर तलवारीच्या धाकावर हद्दपार आरोपी कलीम शेख सलीम शेख (33, रा.दीनदयाल नगर, भुसावळ) हा शदहशत निर्माण करीत असल्याची माहिती मिळाल्यावरून बाजारपेठ पोलिसांनी धाव घेत त्यास शनिवारी सायंकाळी साडेपाच वाजता अटक करण्यात आली. आरोपीच्या ताब्यातून तलवार जप्त करण्यात आली. ही कारवाई पोलिस उपईक्षक गजाजन राठोड, बाजारपेठ पोलिस निरीक्षक दिलीप भागवत यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस नाईक रवींद्र बिर्हाडे, रमण सुरळकर, किशोर महाजन, अनिल पाटील, विकास सातदिवे, ईश्वर भालेराव, चेतन ढाकणे आदींच्या पथकाने केली.




