काँग्रेस कार्यकर्त्यांनी झटून कामाला लागावे


संजय ब्राह्मणे : भुसावळात निवडणुकीच्या अनुषंगाने काँग्रेस कार्यकर्त्यांची बैठक

भुसावळ : भुसावळ विधानसभेसाठी यंदा काँग्रेसला पोषक वातावरण असून काँगे्रस कार्यकर्त्यांनी आता एकदिलाने झटून कामाला लागावे, असे आवाहन करीत यश काँग्रेसलाच मिळणार असल्याचा आशावाद काँग्रेसचे इच्छूक उमेदवार संजय ब्राह्मणे यांनी येथे व्यक्त केला. शनिवारी
भुसावळ जिल्हा काँग्रेस अल्पसंख्यांक विभाग व भुसावळ शहर काँग्रेस कमेटीच्या सर्व फ्रंटल पदाधिकार्‍यांची बैठक माजी आमदार नीळकंठ फालक यांच्या अध्यक्षतेखाली विमल भवन, जामनेर रोड येथे झाली. याप्रसंगी बुथ कमेटी बळकट करण्यावरही मान्यवरांनी भर देत काँग्रेस उमेदवारासाठी जोमाने कामाला लागण्याचे आवाहन करण्यात आले.

यांची होती बैठकीला उपस्थिती
विधानसभा निवडणुकीच्या अनुषंगाने झालेल्या या बैठकीला काँग्रेसचे इच्छूक उमेदवार संजय ब्राह्मणे, जिल्हा अल्पसंख्यांक विभागाचे अध्यक्ष मुन्वर खान, उत्तर माहाराष्ट्र समन्वयक योगेंद्रसिंह पाटील, युवक काँग्रेस अध्यक्ष इम्रान खान, के.बी.काझी, अनिता खरारे, डॉ.सुवर्णा गाढेकर, भरत परदेशी, पुष्कर चौधरी, रमेश जैन यांनी उपस्थित राहून मार्गदर्शन केले.

बुथ कमेटी गठीत करा -माजी आमदार
या बैठकीत बुथ कमेटी गठीत करून वेगवेगळ्या समित्या गठीत करून कामाला लागा, असे आवाहन उपस्थितांना माजी आमदार नीळकंठ फालक यांनी केले. सूत्रसंचालन जिल्हा सरचिटणीस रहिम कुरेशी यांनी केले.

यांची होती उपस्थिती
बैठकीला शहराध्यक्ष सलीम गवळीी, प्रा.मोरे, ईस्माईल गवळी, शैलेंद्र नन्नवरे, राजेंद्र पटेल, रघुनाथ चौधरी, हमीदा गवली, पुष्पा वानखेडे, जामनेर शहराध्यक्ष मुसा पिंजारी, तालुकाध्यक्ष तेजमल जैन, रफीक मौलाना, यावल शहराध्यक्ष रहेमान खाटीक, रमजान खाटीक, फैजपूर शहराध्यक्ष असलम तडवी, हिंगोण्याचे जाकीर भाई, संजय खडसे, रमेश जैन, विजय नरवाडे, नितीन पटाव, छोटु भाई, अशपाक काझी, जाकीर भाई, रहेमार मणियार, दानीश, आसीफ ऊर्फ आसु, मोईन, तौसीफ, जैद, नुरु, कामील, सिराज, सोयब गवली, रवी पाटील, प्रवीणसिंह पाटील, शैलेश बोदडे व अनेक पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते. शहराध्यक्ष सलीम गवळी यांनी आभार मानले.


कॉपी करू नका.