जळगावचे विद्यमान आमदार राजू मामा भोळे 3 रोजी भरणार अर्ज


जळगाव : भाजपाचे विद्यमान आमदार सुरेश (राजू मामा) भोळे 3 रोजी शेकडो भाजपा पदाधिकारी व कार्यकर्त्यांच्या उपस्थितीत आपला उमेदवारी अर्ज भरणार आहेत. गेल्या पाच वर्षात खूप काही कामे केली आहेत त्यामुळे जनता जनार्दन आपल्या सोबत असल्याचा आशावाद त्यांनी आदित्य लॉनमध्ये झालेल्या स्नेह मेळाव्यात व्यक्त केला. प्रसंगी आमदार चंदूलाल पटेल यांनी आमदार भोळे यांना शुभेच्छाही दिल्या.

जळगावातील खड्डे हा मोठा विषय नाही
आमदार भोळे म्हणाले की. जळगाव शहरातील खड्डे हा खूप मोठा विषय नाही. हुडको प्रकरण कर्जमुक्त झाल्यानंतर कुणीही त्यावर बोलले नसल्याचे त्यांनी सांगितले. 3 रोजी जी.एम.फाऊंडेशनच्या कार्यालयापासून जलसंपदा मंत्री गिरीश महाजन, खासदार उन्मेष पाटील, आमदार चंदूलाल पटेल यांच्यासह पक्ष नेते व पदाधिकारी व समर्थकांच्या उपस्थितीत मिरवणूक काढून अर्ज भरण्यात येईल, असेही त्यांनी सांगितले. आगामी विधानसभा निवडणुकीत पक्षाकडून भाजपालाच तिकीट देण्यात आल्याचे ग्वाही देण्यात आल्याने पुन्हा यश मिळवणार असल्याचा आशावादही त्यांनी व्यक्त केला.


कॉपी करू नका.