पाचोर्याचे माजी आमदार दिलीप वाघांसह कार्यकर्त्यांविरुद्ध आचारसंहिता भंगाचा गुन्हा

पाचोरा- पाचोर्याचे माजी आमदार दिलीप वाघ यांच्यासह त्यांच्या 20 ते 23 पुरूष कार्यकर्ते तीन महिला कार्यकर्त्यांविरुद्ध आचारसंहिता भंगाचा गुन्हा दाखल करण्यात आला. राष्ट्रवादी काँग्रेसचे संस्थापक शरद पवार यांच्यावर ईडीने गुन्हा दाखल केल्याच्या निषेधार्थ 27 रोजी दुपारी कुठलीही पूर्व परवानगी न घेता मोर्चा काढण्यात आल्याने आदर्श आचारसंहितेचा भंग केल्याप्रकरणी हवालदार नितीन सूर्यवंशी यांच्या फिर्यादीनुसार गुन्हा दाखल करण्यात आला.