कौटुंबिक कारणावरून दाम्पत्यासह मुलाची तापी नदीत उडी
शिरपूर : कौटुंबिक कारणावरून दाम्पत्यासह मुलाने तापी नदीत उडी घेतल्याची घटना जुन्या मुंबई आग्रा महामार्गावरील गिधाडे पुलावर गुरुवारी दुपारी चार वाजता घडली आहे. शहादा तालुक्यातील लोंढरे येथील नथा बुधा वाघ (माळी, 56) त्यांच्या पत्नी सखुबाई नथा वाघ (माळी, 51) मुलगा गोपाल नथा वाघ (माळी, 30) अशी तापी नदीत बेपत्ता झालेल्यांची नावे आहेत.
घटनास्थळावरून दुचाकी जप्त
गिधाडे तापी पुलावर एक किटकनाशक विषारी औषधाची बाटली व एम.एच 18 .8334 क्रमांकाची बॉक्सर मोटरसायकल व चपला आढळून आल्या आहेत. दुचाकीत सुसाईड नोट आढळल्याची माहिती आहे.


