पिंपळनेर पोलिसांनी दोन लाखांचा अवैध मद्यसाठा पकडला
पिंपळनेर : पिंपळनेर पोलिसांनी अवैधरीत्या होणार्या मद्याची वाहतूक रोखत एक लाख 90 हजारांचा मद्दसाठा जप्त केला शिवाय 14 लाख रुपयांचे वाहन जप्त केले. या प्रकरणी वीरेंद्रसिंह गिरधारी सिंह राठोड (32) व जितेंद्रसिंह गिरधारी राठोड (30, रेह, ता.दहीमाथा, जिल्हा भीलवाडा राजस्थान) अशी अटकेतील आरोपींची नावे आहेत. शुक्रवार, 23 जुलै मध्यरात्री ही कारवाई करण्यात आली.
गोपनीय माहितीवरून कारवाई
पिंपळनेर पोलिस स्टेशनचे सहाय्यक पोलीस निरीक्षक सचिन साळुंखे यांना गोपनीय बातमीदारांमार्फत अवैधरीत्या मद्याची वाहतूक होणार असल्याची माहिती मिळाली होती. पिंपळनेर-सटाणा रस्त्यावर निसान कंपनीची डस्टर जी.जे.05-2466 व जी.जे.21 ए.एच.9390 या वाहनांच्या काचा काचा तुटलेल्या अवस्थेत त्या शेलबारी गावाच्या शिवारातील हॉटेल देव नारायणजवळ रोडच्या बाजूला दिसून आल्या. गस्तीपथकाला वाहनांमध्ये दारूचे खोके आढळून आले. यात इन्फो रियल ब्ल्यू, ग्रेन व्हिस्की, रॉयल चॅलेंज, फायनस प्रीमियम विस्की, स्पेशल प्रेमियम व्हिस्की, ब्लेंडर्स प्राईड इत्यादी प्रकारचे मद्याच्या साठा आढळला. पोलीस कॉन्स्टेबल ज्ञानसिंग फुगर्या पावरा यांच्या फिर्यादीवरून पिंपळनेर पोलिस स्टेशन येथे गुन्हा दाखल करण्यात आला.


