भुसावळात आजी-माजी नगरसेवकांच्या कुटुंबात हाणामारी : परस्परविरोधी दंगलीचा गुन्हा

संशयीत आरोपींमध्ये रीपाइं जिल्हाध्यक्षांचाही समावेश : पालिका निवडणुकीत पराभूत झाल्याचा वाद विकोपाला
भुसावळ : भुसावळ पालिकेच्या निवडणुकीत पराभूत झाल्याचे कवित्व अद्याप संपायला तयार नाही. आजी-माजी नगरसेवकांच्या कुटुंबात या कारणावरून हाणामारी झाल्याने बाजारपेठ पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला.
रीपाइं जिल्हाध्यक्षांसह सहा जणांविरुद्ध गुन्हा
पंधरा बंगला रहिवासी व माजी नगरसेविका नंदा प्रकाश निकम यांच्या फिर्यादीनुसार शुक्रवार, 27 रोजी रात्री 11 वाजेच्या सुमारास रीपाइं जिल्हाध्यक्ष राजू सूर्यवंशी, रोहन सूर्यवंशी, इम्रानखान, अमीर शेख युसूफ, बबलू भांड, समीर शेख यांनी जुन्या वादावरून घरावर दगड, फेकल्यात शिवाय हल्लेखोरांच्या हातात तलवार, पिस्तूल असल्याचा आरोप करण्यात आला आहे. या प्रकरणी उभयंतांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला. दुसर्या गटातर्फे नगरसेविका पूजा सूर्यवंशी (रा.संभाजी नगर, भुसावळ) यांनी फिर्याद दिली. माजी नगरसेविका पती प्रकाश निकम, विनोद निकम, रामदास निकम, आकाश निकम, हेमंत निकम, अंकुश निकम, शिवा गॅनसिंग व आनंद नरवाडे या आठ जणांनी शनिवारी सायंकाळी सात वाजेच्या सुमारास घरात शिरून नंदा निकम यांच्या पराभवाचा राग मनात धरून माझे पती राजू सूर्यवंशी यांना मारहाण करण्याच्या उद्देशाने तलवार, पिस्तूल, लोखंडी रॉड आणत मारहाण केली शिवाय आपल पती दिसेल तेथे त्यास मारून टाकू, अशी धमकी दिली. तपास पोलिस निरीक्षक दिलीप भागवत यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलिस निरीक्षक रावसाहेब र्किीकर पुढील करीत आहेत.
