भुसावळ विधानसभेच्या जागेसाठी काँग्रेसचे जोरदार लॉबींग


संजय ब्राह्मणेंनाच उमेदवारी मिळण्यासाठी पदाधिकार्‍यांचा आग्रह

भुसावळ : भुसावळ विधानसभेची जागा आघाडीतील काँग्रेस, राष्ट्रवादी वा पीआरपीला मिळण्यासाठी इच्छूकांनी जोरदार फिल्डींग लावली असतना काँग्रेसनेदेखील लोकसभेत मिळालेल्या मतांच्या आघाडीमुळे पक्षश्रेष्ठींना ही जागा काँग्रेसचे संजय ब्राह्मणे यांना सोडण्यासाठी जोरदार लॉबींग चालवले आहे. रविवारी जळगाव भेटीवर आलेल्या आमदार सुधीर तांबे आल्यानंतर त्यांच्यासोबत माजी आमदार नीळकंठ फालक, इच्छूक उमेदवार संजय ब्राह्मणे, काँग्रेस अल्पसंख्यांक विभागाचे जिल्हाध्यक्ष मो.मुन्वर खान, शाम तायडे, इम्रान खान आदींच्या उपस्थितीत चर्चा करण्यात आली. दरम्यान, मो.मुन्वर खान यांनी भुसावळची जागा ही काँग्रेसलाच सुटणार असून उमेदवार संजय ब्राह्मणेच 3 रोजी फार्म भरतील, असा दावाही केला.

एक-दोन दिवसात जागा निश्‍चिती होण्याची आशा
भुसावळच्या जागेवर राष्ट्रवादीने दावा करीत सतीश घुले यांना उमेदवार जाहीर केले आहे तर पीआरपीतर्फे प्रा.जोगेंद्र कवाडे यांनीही भुसावळची जागा भुसावळ पीआरपीला सुटल्याचे नागपूरात सांगितले असून दुसरीकडे काँग्रेसदेखील या जागेवर दावा केला आहे त्यामुळे अखेर ही जागा आता कुणाला सुटते? यावर पुढील राजकीय गणिते अवलंबून असणार आहेत.


कॉपी करू नका.