जलसंधारण मंत्री तानाजी सावंत यांच्या वाहनाच्या धडकेत तरुणाचा मृत्यू
बाशी तालुक्यातील शेजळगाव जवळ अपघात : जमावाने वाहन फोडले
सोलापूर : जलसंधारणमंत्री तानाजी सावंत यांच्या गाडीने तरुणाला उडवल्याने उपचारार्थ हलवताना तरुणाचा मृत्यू झाला. संतप्त जमावाने सावंतांच्या गाडीची तोडफोड केली. बार्शी तालुक्यातील शेलगाव इथे सोमवारी सकाळी हा अपघात झाला. अपघाताच्या वेळी तानाजी सावंत गाडीत नव्हते. मी मुंबईला असून पुतण्या गाडी घेऊन बार्शीला जात होता. त्यावेळी अपघात झाल्याची माहिती मला मिळाली. गाडी माझ्या नावावर आहे, अशी माहिती तानाजी सावंत यांनी दिली. दरम्यान, अपघातानंतर गाडीची नंबर प्लेट तोडून नेल्याचा आरोप मृताच्या नातेवाईकांनी केला आहे.
भाजी विकणार्या तरुणाचा मृत्यू
बार्शी तालुक्यातील शेळगाव होळे येथे सोमवारी सकाळी ही घटना घडली. सावंत यांची गाडी बार्शीहून शेळगावकडे निघाली होती. भरधाव वेगात असलेल्या या गाडीनं भाजी विकणार्या एका तरुणाला धडक दिली. त्यात तो जबर जखमी झाला असून त्याला उपचारासाठी नेत असतांनाच त्याचा मृत्यू झाला आहे. श्याम असे मृत्यु तरुणाचे नाव आहे. अपघात झाला तेव्हा तानाजी सावंत हे गाडीतच होते. मात्र, अपघातानंतर लगेचच त्यांनी दुसर्या एका गाडीने घटनास्थळावरून काढता पाय घेतला. संतप्त झालेल्या जमावाने सावंत यांच्या गाडीची तोडफोड केली.