माजी महसूलमंत्री एकनाथराव खडसे उद्या भरणार उमेदवारी अर्ज


कार्यकर्त्यांसह शक्तीप्रदर्शन करून मुहूर्तावर नाथाभाऊ भरणार अर्ज

मुक्ताईनगर- सलग सहा टर्मपासून आमदार व माजी महसूलमंत्री असलेले एकनाथराव खडसे मंगळवारच्या मुहूर्तावर सकाळी 11 वाजता आपला उमेदवारी अर्ज भरणार आहेत. नाथाभाऊ हे मंगळवारी अर्ज भरणार असल्याने त्यांच्या चाहत्यांसह समर्थकांमध्ये उत्साहाचे वातावरण आहे. खडसे यांनी या वृत्ताला दुजोरा देत दोन अर्ज भरणार असल्याचे सांगितले.

यांची राहणार उपस्थिती
माजी मंत्री खडसे हे शहरातील नागेश्‍वर मंदिरापासून आपल्या चाहते व समर्थकांसह अर्ज भरण्यासाठी निवडणूक कार्यालयात जाणार आहेत. प्रसंगी खासदार खासदार रक्षा खडसे, बेटी बचाव बेटी पढावोचे राष्ट्रीय संयोजक डॉ.राजेंद्र जी.फडके, प्रदेश उपाध्यक्ष अशोक कांडेलकर, जेडीसीसी बँक अध्यक्षा रोहिणी खडसे-खेवलकर, जिल्हा परीषद उपाध्यक्ष नंदू महाजन, विधानसभा क्षेत्रप्रमुख रमेश ढोले, जिल्हा सरचिटणीस डॉ.सुनील नेवे., महायुतीचे सर्व पदाधिकारी, लोकप्रतिनिधीव कार्यकर्ते उपस्थित राहणार आहेत.


कॉपी करू नका.