वडगावातील वृद्धाचा खून : आरोपीला जन्मठेपेची शिक्षा


अमळनेर न्यायालयाचा निकाल ; आरोपीस दंडही सुनावला

अमळनेर- पत्नीचा विनयभंग करणार्‍या आरोपीचा पाठलगादरम्यान पीडीतेचे वडीलही आरोपीच्या मागे लागल्यानंतर आरोपीने त्यांच्यावर कुर्‍हाडीने घाव घालून त्यांची हत्या केल्याची घटना चोपडा तालुक्यातील वडगाव बुद्रुक येथे 17 ऑगस्ट 2018 रोजी दुपारी एक वाजेच्या सुमारास घडली होती. या प्रकरणी अमळनेर न्यायालयात खटल्याचे कामकाज चालल्यानंतर न्या. राजीव पांडे यांनी आरोपीस जन्मठेपेची शिक्षा सुनावली शिवाय आरोपीस तीन हजार रुपये दंड व दंड न भरल्यास एक वर्षांची शिक्षा सुनावली. या खटल्यात सरकारी पक्षातर्फे 9 साक्षीदार तपासण्यात आले.

वृद्धाचा कुर्‍हाडीने केला खून
वडगाव बुद्रुक येथील तक्रारदार दशरथ हसरत भील हे 17 ऑगस्ट 2018 रोजी दुपारी एक वाजता घरी जेवण करीत असताना आरोपी मंगलसिंग धनसिग गायकवाड (रा.वडगाव बुद्रुक) याने भील यांच्या पत्नीचा पत्नीचा हात धरल्याने भील व गायकवाड यांच्यात वाद होवून आरोपी मंगलसिंगने त्यांचा गळा दाबण्याचा प्रयत्न केला व त्याचवेळी भील यांनी घरातील कुर्‍हाड काढल्याने आरोपी मंगलसिंग याने पळ काढत मरीमाता मंदिराचा मागील बाजूचा आसरा घेतला असतानाच दशरथ भील यांचे सासरे गणेश सुका भिल यांना घटना कळाल्यानंतर तेदेखील मंदिराजवळ आल्यानंतर आरोपी मंगलसिंग याने गणेश सुका भिल यांच्यावर कुर्‍हाडीने वार करून त्यांना ठार केले. याचवेळी ग्रामस्थांनी आरोपी मंगलसिंग गायकवाड याला पकडून पोलिसांच्या ताब्यात दिल्यानंतर अडावद पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल करण्यात आला होता. या खटल्याचे कामकाज न्यायालयात चालल्यानंतर आरोपी मंगलसिंग याला न्यायालयाने दोषी धरून कलम 302 अन्वये जन्मठेपेची शिक्षा सुनावली तसेच तीन हजार रुपये दंड आणि दंड न भरल्यास एक वर्षांची शिक्षा, कलम 307 अन्व्ये पाच वर्ष शिक्षा दोन हजार दंड दंड न भरल्यास 6 महिने शिक्षा, 354 प्रमाणे दीड वर्ष शिक्षा व एक हजार दंड व दंड न भरल्यास सहा महिने शिक्षा सुनावण्यात आली. तपास अधिकारी पोलीस निरीक्षक गजानन.आर राठोड, पैरवी अधिकारी म्हणून भामरे, केस वोच म्हणून पोना महेश पाटील यांनी काम पहिले. सरकार पक्षातर्फे किशोर आर बागुल, मंगरूळकर यांनी काम पाहिले.


कॉपी करू नका.