बोरविहिर शिवारात अज्ञात महिलेचा खून
डोक्यावर मारहाण करीत झाडाला लटकवला मृतदेह
धुळे : तालुक्यातील बोरविहिर शिवारात 35 ते 40 वर्षीय महिलेचा खून करण्यात आल्याची घटना शुक्रवारी सकाळी नऊ वाजता उघडकीस आल्याने खळबळ उडाली. मध्यरात्रीच्या सुमारास या महिलेच्या डोक्यावर जोरदार प्रहार करून महिलेस गळफास देण्यात आला असावा, अशी शंका आहे. शुक्रवारी सकाळी रस्त्याने जाणार्या-येणार्यांना मृतदेह दिसताच त्यांनी पोलिसांना माहिती कळवली. अपर पोलीस अधीक्षक प्रशांत बच्छाव, साक्री पोलीस उपअधीक्षक प्रदीप महिराळे, तालुक्याचे निरीक्षक हेमंत पाटील यांच्यासह अधिकारी-कर्मचार्यांनी घटनास्थळी धाव घेतली. फॉरेन्सिक तसेच डॉग स्कॉडला पाचारण करण्यात आले. पंचनामा करून महिलेचा मृतदेह शवविच्छेदनासाठी हलवण्यात आला. खुनातील मारेकर्यांना शोधण्याचे आव्हान तालुका पोलिसांपुढे उभे ठाकले आहे.

