घरफोडीप्रकरणी दोन आरोपींना अटक


साक्री : शहरात गुरुवारी मध्यरात्रीनंतर शहरातील मुकुंदनगर व रमेशनगर परिसरात संशयास्पद फिरणारे व्यक्ती व साने गुरुजीनगर येथे एक अ‍ॅपे रीक्षा उभी असल्याची माहिती पोलिसांना मिळाली. थोड्या वेळाने काही व्यक्ती रीक्षामध्ये (एम.एच.18 बी.एच.0639) बसल्याचे पोलिस निरीक्षक दिनेश आहेर यांना माहिती मिळाल्याने त्यांनी पाठलाग करून गंगापूर गावाजवळ लक्ष्मण आटोळे आणि विजय शिकलकर (रा. मोहाडी) या संशयितांना पकडले. त्यांच्याकडूनरीक्षा, चाकू, कटर, हातोडा, विविध प्रकारचे पाने, स्क्रू ड्रायव्हर आदी साहित्य मिळून आल्याची माहिती पोलिसांनी दिली.




मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !