भुसावळ विधानसभा निवडणुकीसाठी 28 इच्छुकांनी नेले अर्ज


आतापर्यंत 56 इच्छुकांनी नेले अर्ज : एकहीअर्ज दाखल नाही

भुसावळ- विधानसभा निवडणुकीची शुक्रवारी अधिसूचना प्रसिद्ध झाल्यानंतर प्रत्यक्षात उमेदवारी अर्ज भरण्यासह अर्ज वाटप करण्याच्या प्रक्रियेला सुरुवात झाली असून पहिल्याच दिवशी 27 इच्छुकांनी 28 उमेदवारी अर्ज नेल्यानंतर रविवारच्या सुटीनंतर सोमवारी पुन्हा 28 इच्छूकांनी अर्ज नेल्यानंतर आतापर्यंत 55 इच्छूकांनी 56 अर्ज नेल्याची माहिती सूत्रांनी दिली. काँग्रेस-भाजप-सेनेसह अपक्षांनी अर्ज नेण्यासाठी भाऊगर्दी केली असून 4 ऑक्टोबरपर्यंत उमेदवारांना उमेदवारी अर्ज दाखल करता येणार आहे तर भुसावळ येथे आजअखेर एकही अर्ज दाखल झालेला नाही. भुसावळ भाजपाचे विद्यमान आमदार संजय वामन सावकारे यांनीदेखील सोमवारी उमेदवारी अर्ज नेल्याचे सूत्रांनी सांगितले.

सोमवारी यांनी नेले अर्ज
सोमवारी भाजपाचे विद्यमान आमदार संजय वामन सावकारे, अपक्ष राजेंद्र केशव सपकाळे, मनीषा महेंद्र सपकाळे, साहेबराव केदारे, निलेश जय सपकाळे, छाया विलास सपकाळे, अपक्ष विनोद माधव सोनवणे, किरण प्रल्हाद वानखेडे, अ‍ॅड.जगदीश भालेराव, सचिन कुंदन वानखेडे, मनेाहर सोमा अहिरे, रवींद्र बाबूराव खरात, वंदना कैलास घुले, सागर सुधाकर बहिरुणे,
आरपीआयतर्फे रमेश दगडू मकासरे, राष्ट्रवादीतर्फे जगन्नाथ देवराम सोनवणे तसेच पुष्पा जगन्नाथ सोनवणे, वंचित बहुजन आघाडीतर्फे विलास धोंडू सपकाळे व विनोद अशोक सोनवणे तसेच दिनेश रामदास ईखारे, महेंद्र नारायण शेजवळकर, मनसेतर्फे शैलेश प्रभाकर बोदडे, शिवसेनेतर्फे गोकुळ नामदेव बाविस्कर, भाजपातर्फे यमुना दगडू रोटे, काँग्रेसतर्फे संजय पंडित ब्राह्मणे व विवेक भीमराव नरवाडे तसेच बसपातर्फे राकेश साहेबराव वाकडे आदी 28 इच्छूकांनी अर्ज नेले आहेत.


कॉपी करू नका.