धक्कादायक : अत्याचारातून तरुणी गर्भवती झाल्याचे कळताच केले विष प्राशन


धुळे : तालुक्यातील पुरमेपाडा येथील 17 वर्षीय अल्पवयीन तरुणीवर एकाने अत्याचार केल्याने पीडीता गर्भवती राहिली व ही बाब स्पष्ट झाल्यानंतर पीडीतेने विष प्राशन केल्याने खळबळ उडाली. अज्ञात आरोपी विरोधात धुळे तालुका पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला असून तरुणीची प्रकृती चिंताजनक आहे. तिने अद्याप जबाब दिलेला नसल्याने अत्याचार करणार्‍याचे नाव समोर आले नाही. या प्रकरणी पीडित मुलीच्या भावाने फिर्याद दिली आहे. याबाबत पोलिस उपनिरीक्षक प्रकाश पाटील तपास करत आहे.




मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !