चोरटे शिरजोर : डॉक्टरांकडे धाडसी घरफोडी


धुळे : शहरातील देवपुरातील विद्यानगरी परिसरात राहणारे बालरोगतज्ज्ञ डॉ. संजय जोशी हे कुटूंबासह बाहेर गेल्याने चोरट्याने संधी साधत तीन लाख 35 हजारांचा ऐवज लांबवला. या प्रकरणी देवपूर पोलिस ठाण्यात याबाबत गुन्हा दाखल करण्यात आला. डॉ. संजय जोशी हे घराला कुलूप लावून ते बाहेर गेल्यानंतर चोरट्यांनी कुलूप तोडत कपाटातील ऐवज लांबविला. चोरट्यांनी सुमारे 75 हजार रुपये किंमतीच्या 5 तोळे वजनाच्या दोन बांगड्या, सुमारे एक लाख रुपयांचा दीड तोळ्याची सोन्याची चेन व हिर्‍यांचे पदक, एक लाख रुपयांचे कानातील दागिने, 20 हजार रुपयांचे कर्णफुले, सुमारे 40 हजार रोख असा एकूण तीन लाख 35 हजारांचा ऐवज लांबविला. या प्रकरणी डॉ.संजय जोशी यांच्या तक्रारीवरुन देवपूर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला.




मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !