बिग ब्रेकींग : माजी महसूलमंत्री एकनाथराव खडसेंची लोणावळासह जळगावातील मालमत्ता ईडीकडून जप्त


जळगाव : भोसरी जमीन प्रकरणात ईडीने माजी मंत्री व राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते एकनाथराव खडसे यांची लोणावळासह जळगाव येथील मालमत्ता जप्त केली असून त्याचे मूल्य एकूण सुमारे पाच कोटी अससल्याचे सूत्रांनी सांगितले.
मनी लाँडरिंग प्रकरणात एकनाथ खडसेंची चौकशी केली जात असतानाच ही कारवाई ईडीकडून करण्यात आली आहे. कारवाईबाबत ईडीने ट्वीट करून याबद्दल माहिती दिली असून या कारवाईने मोठी खळबळ उडाली आहे.

ही बातमीदेखील महत्वाची- पैशांच्या वादातून अमळनेरात 35 वर्षीय तरुणाचा खून




भोसरी जमिनीमुळे वाढल्या अडचणी
भोसरी जमीन खरेदी प्रकरणामुळे एकनाथराव खडसे यांच्या अडचणीत वाढ झाली असतानाच आता पुन्हा मालमत्ता जप्त करण्यात आल्याने सर्वत्र खळबळ उडाली आहे. खडसे यांचे जावई गिरीश चौधरी यांना यापूर्वीच ईडीने अटक केली आहे.

31 कोटींची मालमत्ता अवघ्या तीन कोटींमध्ये खरेदी
2016 मध्ये एकनाथराव खडसे आणि त्यांचे जावई गिरीश चौधरी यांनी पुण्यातील भोसरी येथील जमीन खरेदी केल्याचा आरोप आहे. या जमिनीचा बाजारभाव 31 कोटी होता, पण गिरीश यांनी ही मालमत्ता तीन कोटींना विकत घेतली. ही जमीन एमआयडीसीच्या मालकीची होती. एकनाथराव खडसे हे त्यावेळी महसूलमंत्री होते. अगदी कमी किंमतीत गिरीश यांना ही जमीन देण्यात आली. गिरीश यांच्याकडे असलेल्या तीन कोटी रुपयांचा नेमका स्रोत काय? याचा तपास ईडी करत आहे.


मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !