अनियमित पगार : साक्री आगारातील बस चालकाची आत्म्हत्या


धुळे : साक्री आगारात चालक असलेल्या कमलेश बेडसे असे यांनी आत्महत्या केल्याने एस.टी.च्या वर्तुळात मोठी खळबळ उडाली. पगार अनियमीत होत असल्यामुळे हतबल होवून एस.टी.चालकाने हे टोकाचे पाऊल उचलल्याचे बोलत जात आहे. चालकाच्या आत्महत्येनंतर संतप्त सहकारी कर्मचार्‍यांनी आंदोलन पुकारले. या आंदोलनामुळे नागपूर-सुरत महामार्गावर वाहतूक व्यवस्था विस्कळीत झाली. आर्थिक मदत मिळत नाही तोपर्यंत मृतदेह ताब्यात घेणार नाही असा पवित्रा बेडसे यांच्या नातेवाईक व कर्मचारी संघटनेकडून घेण्यात आला होता. अगोदरच कमी वेतन व ते देखील अनियमीत मिळत असल्यामुळे लोकांची देणी कशी द्यायची ? अशी विवंचना बेडसे यांच्यासारख्या कित्येक कर्मचार्‍यांना असल्यामुळे संतप्त प्रतिक्रिया आंदोलनाच्या वेळी उमटल्या.




मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !