भुसावळकरांना दिलासा : बसस्थानक रस्त्यावरील खड्डे अखेर बुजवले


भुसावळ : भुसावळ शहरातील सर्वाधिक दुरवस्था झालेल्या स्टेशन रस्त्याची डागडूजी करण्यात आली असून गुरुवारी मुरूम टाकून या रस्त्यावरील खड्डे बुजवण्यात आल्याने वाहनधारकांसह शहरवासीयांमध्ये समाधान व्यक्त होत आहे. गेल्या अनेक महिन्यांपासून या रस्त्याची मोठ्या प्रमाणावर दुरवस्था झाल्याने वाहनधारकांमध्ये रेल्वे प्रशासन व सत्ताधार्‍यांविषयी तीव्र रोष व्यक्त होत होता. पालिका प्रशासनाने उशीरा का होईना रस्त्याच्या डागडूजीसाठी पुढाकार घेतल्याने वाहनधारकांमधून समाधान व्यक्त करण्यात आले. गुरुवारी सकाळी उपनगराध्यक्षा सोनी संतोष बारसे व माजी नगरसेवक संतोष बारसे यांच्या प्रमुख उपस्थितीत रस्त्यावरील खड्ड्यांमध्ये मुरूम टाकण्यात आल्याने समाधान व्यक्त करण्यात आले.

डांबरीकरणालाही लवकरच मिळावा मुहूर्त
स्टेशन रस्त्याचे नशीब उजळण्यासाठी खासदार रक्षा खडसे, आमदार संजय सावकारे यांनी यांनी रेल्वे अधिकार्‍यांसोबत बैठक घेत रस्ता दुरुस्तीची सूचना केली असलीतरी प्रत्यक्षात तिढा सुटलेला नाही. रेल्वे व पालिका प्रशासनाने तातडीने या संदर्भात बैठक घेवून रस्ता डांबरीकरणाचा प्रश्‍न मार्गी लावण्याची अपेक्षा व्यक्त होत आहे.




भुसावळातील रस्त्यांवरून पालकमंत्री संतप्त
शहरातील रस्त्यांचे बीबीएम झाले मात्र अद्याप सिलकोट व कारपेटचा पत्ता नसल्याने तसेच नवीन मंजुरी मिळालेल्या रस्त्यांच्या कामाला गती नसल्याची बाब पालकमंत्री गुलाबराव पाटील यांच्या कानावर आल्यानंतर त्यांनी मुख्याधिकारी संदीप चिद्रवार यांना संपर्क साधून भुसावळच्या रस्त्यांचा सत्यानाश थांबवा, अशा सूचना केल्या होत्या. शहरात पालिकेने 12 कोटींच्या निधीतून रस्त्यांची कामे सुरु केली खरी पण अद्यापही एकाही प्रमुख रस्त्याचे काम पूर्ण झालेले नाही. बीबीएमवर गाडे अडकले आहे. इतर योजनांमधून मंजूर रस्ते कामांना सुरूवात नाही. त्यामुळे पालकमंत्री गुलाबराव पाटील यांनी सोमवारी मुख्याधिकारी चिद्रवार यांना संपर्क करून शहरातील खड्डे पडलेल्या रस्त्यांची यादी वाचून दाखवली. बीबीएम झालेल्या या रस्त्यांवर सिलकोट, कारपेटची कामे करा. अन्यथा भुसावळातील रस्त्यांचा सत्यानाश होईल, अशा शब्दांत पालकमंच्त्र्यांनी नाराजी व्यक्त केली होती.

ही बातमी वाचली का- अंतुर्लीत माय-लेकाची आत्महत्या


मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !