दर्यापूरच्या युवकाची गगनभरारी ; युपीएससी परीक्षेत मिळवले यश


एसीपीपदी निवडीनंतर वरणगाव महाविद्यालयात सत्कार

वरणगाव- ग्रामीण भागात रहिवासी असतानाही प्रतिकुल परीस्थितीवर मात करून दर्यापूरच्या मनोज प्रकाश पाटील या युवकाने युपीएससी परीक्षेत यश मिळवल्याने त्यांच्यावर सर्व स्तरावरून शुभेच्छांचा वर्षाव होत आहे. युपीएससी परीक्षेतील तब्बल सव्वा लाख परीक्षार्थींमधून ते संपूर्ण भारतातून 224 रँकने उत्तीर्ण झाले आहेत. केंद्रीय गृह मंत्रालयात अंतर्गत एसीपीपदी त्यांची निवड झाली आहे. या यशाबद्दल वरणगाव शहरातील महात्मा गांधी विद्यालयात त्यांचा सहृदय सत्कार करण्यात आला. यावेळी संस्थेच्या अध्यक्षा वंदना पाटील, संचालक मंडळ, मुख्याध्यापक आर.यु.वाघ उपस्थित होते. भुसावळचे हृदयरोग तज्ज्ञ डॉ.राजेश मानवतकर यांचाही यावेळी सत्कार करण्यात आला.

जितका मोठा संघर्ष यशही तेव्हढेच मोठे
यशाबद्दल ब्रेकींग महाराष्ट्रच्या प्रतिनिधीशी बोलताना मनोज पाटील म्हणाले की, यश मिळवण्यासाठी तब्बल पाच वर्ष न्यू दिल्लीत संघर्ष करावा लागला. सुरुवातीला दोन प्रयत्नानंतरही यश न मिळाल्याने अनेकांनी परीक्षा न देण्याचा सल्ला दिला मात्र खचलो नाही, अभ्यासात सातत्य टिकवून ठेवलो व तिसर्‍या प्रयत्नात यश मिळाले. जितका मोठा संघर्ष यशही तेव्हढेच मोठे असते, असे सांगून आजच्या युवकांनी स्वप्न मोठे पहावे, असा सल्ला त्यांनी देत क्षमता असताना युवक ती आजमावत नाही, योग्य मार्गदर्शन मिळत नाही त्यामुळे ग्रामीण भागातील युवकांनी परीस्थितीवर रडत बसण्यापेक्षा सातत्याने शिकत रहावे, मोठे स्वप्न पहावे व ते पूर्ण होण्यासाठी झटत रहावे, एक दिवस निश्‍चित यश मिळेल, असा आशावाद त्यांनी व्यक्त केला.


कॉपी करू नका.