आमदार हरीभाऊ जावळे मंगळवारपासून करणार प्रचाराचा शुभारंभ


संकट मोचकांच्या उपस्थितीत ओंकारेश्‍वर मंदिरावर श्रीफळ वाढवणार : माजी मंत्री खडसेंसह अनेकांची उपस्थिती

भालोद : रावेर विधानसभेतील विद्यमान आमदार हरीभाऊ जावळे हे जलसंपदा मंत्री गिरीश महाजन यांच्या उपस्थितीत मंगळवार, 8 रोजी सकाळी नऊ वाजता तामसवाडी येथील ओंकारेश्‍वर मंदिरावर श्रीफळ वाढवून प्रचाराचा शुभारंभ करणार आहेत. याप्रसंगी माजी मंत्री एकनाथराव खडसे, खासदार रक्षा खडसे यांच्यासह पदाधिकार्‍यांची उपस्थिती राहणार आहे.

या पदाधिकार्‍यांची राहणार उपस्थिती
अशोक कांडेलकर, राजेंद्र फडके, संजीव पाटील, संघटन सरचिटणीस प्रा.सुनील नेवे, किशोर काळकर, नंदू महाजन, शिवसेना जिल्हाप्रमुख चंद्रकांत पाटील, प्रल्हाद महाजन, योगराज पाटील, रवींद्र सोनवणे, आनंद बाविस्कर, रवींद्र पवार, तुषार पाटील, अरुण गद्रे यांच्यासह सेना-भाजपा युतीतील घटक पक्षांचे पदाधिकारी व कार्यकर्ते तसेच मतदारसंघातील विविध पालिकांचे नगराध्यक्ष, नगरसेवक उपस्थित राहणार असल्याचे सूत्रांनी सांगितले.




मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !