भुसावळातील अपक्ष उमेदवार डॉ.मधु मानवतकरांना माजी आमदार चौधरींचा पाठिंबा
भुसावळ – माजी आमदार संतोष चौधरी यांनी रविवारी रात्री तेली समाज मंगल कार्यालयातील मेळाव्यात अपक्ष उमेदवार सतीश घुले यांच्याऐवजी डॉ.मधू राजेश मानवतकर या आपल्या उमेदवार असल्याची घोषणा केली.
यांची व्यासपीठावर उपस्थिती
व्यासपीठावर उमेदवार डॉ.मधू राजेश मानवतकर, त्यांचे पती डॉ.राजेश मानवतकर, माजी नगराध्यक्ष व ओबीसी सेल जिल्हाध्यक्ष उमेश नेमाडे, कृउबा सभापती सचिन चौधरी, गटनेता उल्हास पगारे, ललित मराठे, मयुरी पाटील, नितीन धांडे, बाबूसिंग चितोडीया, पंढरीनाथ पाटील, तालुकाध्यक्ष दीपक मराठे यांच्यासह मोठ्या संख्येने पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.



