उचंदा परीसरातील शेतकर्यांनी घेतली माजी मंत्री खडसेंची भेट
चक्रीवादळानंतर केळी भुईसपाट झाल्यानंतरही मदत नाहीच
मुक्ताईनगर : माजी म्हसूल मंत्री एकनाथराव खडसे यांची उंचदा येथील शेतकरी व राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे पदाधिकार्यांनी भेट घेत चक्रीवादळात नुकसान झाल्यानंतरही प्रशासनाकडून अद्यापपर्यंत भरपाई मिळाली नसल्याची कैफियत मांडली. 27 मे रोजी उचंदा परीसरात चक्रीवादळासह गारपीट झाल्याने केळी भुईसपाट होवून कोट्यवधींचा फटका बसला. लोकप्रतिनिधींसह प्रशासनाच्या अधिकार्यांनी पाहणी केली मात्र प्रत्यक्षात अद्यापपर्यंत शेतकर्यांना मदत मिळाली नसल्याचे यावेळी शेतकरी म्हणाले. शेतकर्यांच्या मागणीची दखल घेत खडसे यांनी कृषी मंत्री दादा भुसे यांच्याशी संपर्क साधला. 15 दिवसात शेतकर्यांना भरपाई मिळेल, असे आश्वासन यावेळी देण्यात आले.
यांची होती उपस्थिती
यावेळी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे जिल्हा सरचिटणीस ईश्वर रहाणे, तालुकाध्यक्ष यु.डी.पाटील, माजी सभापती सुधाकर पाटील, जगन्नाथ पांडुरंग पाटील, ओबीसी तालुकाध्यक्ष साहेबराव सिंगतकर, युवक तालुकाध्यक्ष शाहिद खान, तालुका सरचिटणीस रवींद्र दांडगे, गोपाळ सीताराम पाटील, विनायक लक्ष्मण पाटील, प्रकाश काशीनाथ पाटील, राजेंद्र गजमल पाटील, साहेबराव ओंकार पाटील, शांताराम आत्माराम पाटील, साहेबराव किसन पाटील, बंडू त्र्यंबक पाटील, जितेंद्र गजमल पाटील आदींची उपस्थिती होती.








