यावल तालुक्यातील शेतकर्‍याचा अंगावर वीज कोसळल्याने जागीच मृत्यू


यावल : गुरे चराईसाठी शेतात गेलेल्या 50 वर्षीय पशूपालक शेतकर्‍याचा अंगावर वीज कोसळल्याने मृत्यू झाला. शुक्रवारी दुपारी ही घटना घडली. ज्ञानेश्वर सुका बाऊस्कर (50) असे मयत शेतकर्‍याचे नाव आहे.
डोंगरकठोरा, ता.यावल येथील धनगर वाड्यातील रहिवासी ज्ञानेश्वर सुका बाऊस्कर हे शुक्रवारी गुरे चराईसाठी सातपुड्याच्या पायथ्याशी अभोटा शिवारात गेले असता पाऊस सुरू असतानाच वीज कोसळल्याने शेतकर्‍याचा जागीच मृत्यू झाला. पोलीस पाटील राजरत्न आढळे, सरपंच नवाज तडवी, तलाठी वसीम तडवी, दिलीप तायडे आदीनी धाव घेत कुटुंबीयांचे सांत्वन केले. मयत शेतकर्‍याच्या पश्चात पत्नी, दोन मुले, सून असा परीवार आहे.

चिंचखेड प्रगणेत वीज पडून महिलेचा मृत्यू 





मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !