विविध क्षेत्रातील उल्लेखनीय कामगिरी करणार्‍यांचा श्रीराम फाउंडेशनच्या वतीने रावेरात सत्कार


रावेर : श्रीराम फाउंडेशनच्या वतीने विविध क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी करणार्‍या गुणवंतांचा सत्कार मॅक्रो व्हिजन स्कूलमध्ये करण्यात आला. अध्यक्षस्थानी मुख्याध्यापक महामंडळाचे अध्यक्ष जे.के.पाटील होते.व्यासपीठावर श्रीराम फाउंडेशनचे अध्यक्ष श्रीराम पाटील, नगराध्यक्ष दारा मोहम्मद, दर्जी फाउंडेशनचे गोपाळ दर्जी, मराठा सेवा संघाचे जिल्हाध्यक्ष राम पवार, तहसीलदार उषाराणी देवगुणे, खरेदी-विक्री संघाचे चेअरमन पी.आर.पाटील, शैलेश राणे, पंचायत समिती सदस्य योगेश पाटील, सरपंच संघटनेचे अध्यक्ष प्रमोद चौधरी, गणेश महाजन यांच्यासह मान्यवर उपस्थित होते. यावेळी विविध क्षेत्रातील 70 मान्यवरांचा उपस्थित अतिथींच्या हस्ते सत्कार करण्यात आला. सूत्रसंचालन शिक्षिका सुनीता पाटील व प्रीती कुलकर्णी यांनी केले. संपर्क अधिकारी घनश्याम पाटील यांनी आभार मानले. यावेळी तहसीलदार उषाराणी देवगुणे, फाउंडेशनचे अध्यक्ष श्रीराम पाटील, शिक्षिका कल्पना पाटील व कांचन राणे यांनी यावेळी मनोगत व्यक्त केले.


मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !