पंतप्रधानांनी सुरू केलेल्या योजना घरा-घरांपर्यंत पोहोचवा : नंदकिशोर महाजन
रावेर : भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे विचार तसेच त्यांनी सुरु केलेल्या योजना प्रत्येक गरीब कुटुंबाच्या घरापर्यंत पोहोचाव्यात म्हणून प्रत्येक कार्यकर्त्यांनी सज्ज रहावे व उत्तम आरोग्य ठेवण्यासाठी आपला परीसर स्वच्छ ठेवावा, असे आवाहन जि.प.सदस्य नंदकिशोर महाजन यांनी येथे केले. राष्ट्रपिता महात्मा गांधी यांच्या जयंतीनिमित्त तसेच भारताचे प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांचा वाढदिवसानिमित्त सेवा व समर्पण अभियान भाजपातर्फे रावेर तालुक्यात राबविले जात आहे. या निमित्त शनिवार, 2 रोजी भाजपातर्फे स्वच्छता अभियान कार्यक्रम राबविण्यात आला. यावेळी गरीब कुटुंबाना धान्य वाटप करण्यात आले. यावेळी आयोजित विविध कार्यक्रमात जिल्हा बँक संचालक तथा जिल्हा परीषद सदस्य नंदकिशोर महाजन यांनी आपले विचार कार्यकर्ते यांच्या समोर मांडले.
यांची होती उपस्थिती
सेवा व समर्पण अभियानानिमित्त आयोजित पंचायत समितीचे माजी शिक्षण समिती सभापती सुरेश धनके, भाजपा जिल्हा उपाध्यक्ष पद्माकर महाजन, समिती सभापती कविता कोळी, तालुकाध्यक्ष राजन लासुलकर, पंचायत समिती सदस्य अनिता चौधरी, भाजपा सरचिटणीस महेश चौधरी, योगीता वानखेडे, जुम्मा तडवी, पी.के.महाजन, हरलाल कोळी, संदीप सावळे आदी भाजपा लोकप्रतिनिधी व कार्यकर्ते उपस्थित होते.



भाजपातर्फे मोफत रेशन बॅग वाटप
पंतप्रधान गरीब कल्याण योजनेंतर्गत स्वस्त धान्य दुकानामध्ये मोफत धान्य वाटप करण्यात आले. यावेळी मोफत रेशन बॅग वाटप करण्यात आल्या. जनतेला स्वच्छते बद्दल जनजागृती करण्यात आली. रावेरसह मस्कावद, तांदवाडी, रसलपूर येथे विविध कार्यक्रम घेण्यात आले.
