विविध मागण्यांसाठी यावलमध्ये ग्रामरोजगार सेवकांचे लाक्षणिक उपोषण
यावल : यावल पंचायत समितीच्या आवारामध्ये ग्राम रोजगार सेवकांचे एक दिवसीय लाक्षणिक उपोषण करण्यात आले. ग्राम रोजगार सेवकांना कायम सेवेत सामावून घ्यावी, ग्राम रोजगार सेवकांच्या वैयक्तिक खात्यावर मानधन जमा करावे, ग्रामरोजगार सेवकांना प्रवास भत्ता, अल्प आहार मिळावा तसेच ग्रामपंचायतीच्या मासिक सभेमध्ये ग्रामरोजगार सेवकांना कमी करणे विषयी कोणताच शासकीय परिपत्रक किंवा शासन निर्णय नसताना विनाकारण वेठीस धरणची नियमबाह्य पद्धत बदलविण्यात यावी यासह विविध मागण्यासंदर्भात उपोषण करण्यात आले. आमदार शिरीष चौधरींनी उपोषणार्थींची भेट घेत कायम सेवेत समाविष्ट करण्यासाठी शासन दरबारी प्रयत्न करण्याचे आश्वासन दिले. भाजपा तालुकाध्यक्ष उमेश फेगडे यांनी समस्या विरोधी पक्ष नेते देवेंद्र फडवणीस यांच्यापर्यंत पोहोचवून न्याय देण्याचा प्रयत्न केला जाईल, अशी ग्वाही दिली.
यांची उपोषणाला भेट
जिल्हा परीषद गट नेते प्रभाकर आप्पा सोनवणे, पंचायत समिती गटनेते शेखर पाटील, युवा नेते धनंजय चौधरी, राष्ट्रवादीचे युवक तालुकाध्यक्ष अॅड.देवकर पाटील, उपाध्यक्ष पवन पाटील, युवक जिल्हा सरचिटणीस विनोद पाटील, भाजपाचे तालुकाध्यक्ष उमेश फेगडे, नगरसेवक डॉ.कुंदन फेगडे आदींनी उपोषणाला भेट दिली. या उपोषणात ग्रामरोजगार सेवक संघटनेचे तालुकाध्यक्ष खुशाल पाटील, उपाध्यक्ष बाळू तायडे, सचिव ईश्वर अडकमोल, सहा.उपाध्यक्ष दीपक कोळी, ग्रामरोजगार सेवक कैलास चौधरी, अमृत बाविस्कर, लक्ष्मण सपकाळे, दिलीप तायडे, निलेश तायडे, सरफराज तडवी, विलास पाटील, गोकुळ तायडे, साहेबराव कोळी, मोहम्मद तडवी, वसीम पिंजारी लोकमान तडवी, अरुण पाटील, अनिल डाके, फकिरा तडवी, घनश्याम पाटील, अरुण सोनवणे, राजेंद्र पाटील, मेहरबान तडवी, कैलास सोळुंके, दिगंबर खडसे, सुनील सोनवणे, ईश्वर सपकाळे, शरीफ तडवी, योगेश महाजन आदी ग्रामरोजगार सेवक उपस्थित होते.



