रावेर तालुक्यात सुकी व मंगळूर धरण भरण्याच्या उंबरठ्यावर

पावसाने जनजीवन विस्कळीत ; सुकी नदीला आला पूर
रावेर- तालुक्यात बुधवारी रात्रीपासून पाऊस कायम असल्याने नदी नाल्यांसह शाळांमध्ये मोठ्या प्रमाणावर पाणी साचले आहे. पावसाच्या परीस्थितीवर तहसीलदार उषाराणी देवगुणे लक्ष ठेवून आहेत. बुधवारपासूनच्या पावसामुळे सुकी नदीला पूर आला असून भोकर, नागोई, मात्राण नदीसह रावेर शहरातून वाहणार्या नागझिरीतदेखील मोठ्या प्रमाणावर पाणी आले असून मंगळूर धरण अर्धा मीटर तर सुकी धरण एक मीटरने खाली असून कोणत्याही क्षणी ते भरले जाणार असल्याचे मध्यम प्रकल्प विभागाचे महेश पाटील यांनी सांगितले. दरम्यान, रावेर शहरातील सरदार जी.जी.हायस्कूल, यशवंत विद्यालयासोबत अनेक शाळांमध्ये पावसाचे पाणी साचले आहे.
