आभोडा धरणाजवळ तडसाचा संशयास्पद मृत्यू


रावेर : रावेर तालुक्यातील आभोडा धरणाजवळ वन्य प्राणी तडसाचा संशयास्पद मृत्यू झाल्याची माहिती असून या घटनेमुळे वन्य प्रेमींमध्ये संतापाचे वातावरण निर्माण झाले आहे. अनेक दिवसांपासून तडसाचा मृत्यू झाल्याचा अंदाज आहे. वनविभागाच्या माहितीनुसार रावेर तालुक्यातील आभोडा धरणाजवळील कपार्टमेंट क्रमांक 17 च्या टीसीएमजवळ कुजलेल्या अवस्थेत तडस प्राणी आढळला. मृत तडसावर वनपाल अतुल तायडे यांनी अंत्यसंस्कार केले. याबाबत वनक्षेत्रपाल मुकेश महाजन यांना संपर्क साधण्याचा प्रयत्न केला असता होवू शकला नाही.


मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !