रावेरात तलाठी संघटनेतर्फे निदर्शने : पुणे जमाबंदी आयुक्तांची बदलीची मागणी


रावेर : महाराष्ट्र राज्य तलाठी, पटवारी मंडळ अधिकारी समन्वय महासंघाचे अध्यक्ष डुबल (आप्पा) यांनी राज्यातील नैसर्गिक आपत्ती व ई पीक पाहणीसंदर्भात पाठवलेल्या व्हॉटस्अ‍ॅप संदेशाला पुणे जमाबंदी आयुक्त कार्यालयाचे राज्य समन्वयक रामदास जगताप यांनी ‘मुर्खासारखे संदेश पाठवू नका‘, असे म्हटल्याने पर्यायाने राज्यातील सर्व तलाठी, मंडळाधिकारी व तलाठी संवर्गातील अव्वल कारकून यांचा अपमान झाल्याने जगताप यांच्या कार्यपद्धत्तीचा निषेध करीत त्यांची बदली करावी, अशी मागणी रावेर तलाठी संघटनेने करीत रावेर तहसीलबाहेर निदर्शने केली. आंदोलनाला कोतवाल व महसूल संघटनेने सुध्दा पाठिंबा दिला. या आंदोलनात मंडळ अधिकारी विठोबा पाटील, सचिन पाटील, कौशल चौधरी, प्रवीण पाटील, अध्यक्ष हनीफ तडवी, गुणवंत बारेला, अनंत खवले, मीना तडवी, सी.जी.पवार, जनार्दन बंगाळे, राजेंद्र शेलकर, शरद पाटील, गोपाल मगन, समीर तडवी, यासीन तडवी, प्रवीण वानखेडे आदी आंदोलनात सहभागी झाले.


मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !