भुसावळातील प्रा.डॉ.डी.एम.ललवाणी यांचा राज्यस्तरीय आदर्श शिक्षक पुरस्काराने सन्मान


भुसावळ : शहरातील श्रीमती प.क.कोटेचा महिला महाविद्यालयाचे माजी प्रभारी प्राचार्य प्रा.डॉ.डी.एम.ललवाणी यांना राजनंदिनी बहुद्देशीय संस्थेतर्फे राज्यस्तरीय आदर्श शिक्षक पुरस्कार नुकताच प्रदान करण्यात आला. या पुरस्कार प्रसंगी श्री राजपूत करणी सेनेचे जिल्हा उपाध्यक्ष बी.एस.खंडाळकर, विलाससिंह पाटील, सुमित पाटील, साहित्यीक अ.फ.भालेराव, यावल येथील माजी प्राचार्य प्रा.सुरेश वाघ, राजपूत करणी सेना खान्देशी विभागाचे अध्यक्ष प्रवीणसिंग पाटील, गणेश अमृतकर, सिंगल वुमन फौंडेशनच्या मीनाक्षी चव्हाण, ग.स.सोसायटीचे माजी अध्यक्ष मनोज पाटील, पत्रकार ज्ञानेश्वर वाघ आदी मान्यवर उपस्थित होते. प्रा.ललवाणी यांनी केलेले सामाजिक, धार्मिक, अध्यात्मिक व शैक्षणिक कार्य या सर्वांचा साकल्याने विचार करून हा पुरस्कार त्यांना जाहीर करण्यात आला होता. ललवाणी यांनी मनोगत व्यक्त करून सर्व उपस्थितांची मने जिंकुन आत्मपरीक्षण करण्यास उद्युक्त केले.

 





मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !