ट्रकमध्ये चालक झोपताच चोरट्यांनी लांबवले 18 लाखांचे वेलदोडे


धुळे : ट्रक चालक झोपला असताना चोरट्यांनी तब्बल 18 लाखांचे वेलदोडे लांबवले. ही घटना नरडाणा येथे 20 जुलै 2021 रोजी घडली होती. या प्रकरणी न्यायालयाच्या आदेशानुसार नरडाणा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. 20 जुलै रोजी सालेमहून रवींद्र रोडलाईन्सचा ट्रक (टी.एन.52 आर.2814) हा तमिळनाडू येथून जयपूर (राजस्थान) येथे निघाला होता मात्र ट्रक नरडाणा येथे आल्यानंतर चालकाला झोप येत असल्याने उड्डाणपुलाखाली ट्रक उभा असताना चोरट्यांनी ट्रकचे सील तोडून वेलदोड्याच्या प्रत्येकी 50 किलोच्या 32 बॅगा चोरून नेल्या. चोरी झालेल्या या वेलदोडा मालाची किंमत 18 लाख रुपये आहे. बाबू थाहेर हुसेन (59, रा.करेमकामेंट, किटची पल्लायाम, सालेम, तमिळनाडू) यांनी पोलिसांत दिलेल्या फिर्यादीनुसार अज्ञात चोरट्यांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला. पोलिस उपनिरीक्षक पाटील तपास करीत आहेत.

 





मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !