यावलला किरकोळ कारणावरून एकाला मारहाण


यावल : फैजपूर ते यावल रोडवरील भाग्यश्री हॉटेलजवळ दारूच्या नशेत किरकोळ कारणावरून हॉटेलमधील खुर्ची मारून एकाला जखमी केल्याची घटना मंगळवार, 12 ऑक्टोबर रोजी दुपारी घडली. याप्रकरणी रात्री 10 वाजता एकाविरोधात यावल पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला. फकीरा रामा जावरे (55, रा.मेन रोड, यावल) हे मंगळवार, 12 ऑक्टोबर रोजी दुपारी एक वाजेच्या सुमारास फैजपूर ते यावल रोडवरील भाग्यश्री हॉटेलजवळून जात असताना संशयीत आरोपी समाधान प्रभाकर कुंभार (रा.यावल) हा दारूच्या नशेत फकीरा जावरे यांना फकीर्‍या या नावाने चिडवत होता. याचा जाब विचारला असता समाधान कुंभार याने हॉटे मधील खुर्ची उचलून फकीरा जावरे यांच्या डोक्यात टाकली. त्यात त्यांच्या डोक्याला गंभीर दुखापत झाली. रात्री 10 वाजता फकीरा जावरे यांच्या फिर्यादीवरून यावल पोलीस ठाण्यात समाधान कुंभार याच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला. पुढील तपास सहाय्यक फौजदार नेताजी वंजारी करीत आहे.


मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !