माजी मंत्री गुलाबराव देवकरांसह आमदार चंद्रकांत सोनवणेंची सुटका


नाशिक : घरकुल प्रकरणातील शिक्षा सुनावलेले आरोपी तथा जळगावचे माजी पालकमंत्री गुलाबराव देवकरांसह आमदार चंद्रकांत सोनवणे यांची मंगळवारी कारागृहातून सुटका झाली आहे. देवकर यांचा जामीन अर्ज औरंगाबाद खंडपीठाने चार दिवसापूर्वी मंजूर केला होता. जळगाव नगर पालिकेच्या राज्यभरात गाजलेल्या घरकुल घोटाळ्यातील शिक्षा झालेल्या आरोपींना शिक्षा सुनावण्यात आली होती. त्यानंतर आरोपींनी जामिनासाठी औरंगाबाद कोर्टात धाव घेतली होती. 4 ऑक्टोंबर रोजी औरंगाबाद येथील उच्च न्यायालयाच्या खंडपीठाने जामीन मंजूर केला होता. त्यात माजी मंत्री गुलाबराव देवकर तसेच आ.चंद्रकांत सोनवणे यांच्यासह शिक्षा झालेल्या सुमारे 36 नगरसेवकांचा समावेश होता.


मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !