मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आज धुळे जिल्हा दौर्‍यावर


नेरसह साक्री शिरपूरात सभा : अमरीशभाई पटेलांसह अनेक भाजपावासी होणार

धुळे : भाजपा उमेदवारांच्या प्रचारार्थ मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची बुधवार, 9रोजी धुळे जिल्ह्यात तीन सभा होत आहे. यावेळी यावेळी काँग्रेसचे माजी शिक्षण मंत्री अमरीशभाई पटेल यांच्यासह हजारो पदाधिकारी, कार्यकर्ते भाजपावासी होणार आहेत. भाजप महायुतीचे उमेदवार काशिराम पावरा यांच्या प्रचारार्थ मुख्यमंत्र्यांची सभा होत असून ती शिरपूर शहरातील आर. सी. पटेल फार्मसी कॉलेजच्या मैदानावर बुधवारी दुपारी 12 वाजता होईल. तसेच मुख्यमंत्र्यांची सकाळी दहा 10 वाजता धुळे ग्रामीण मतदारसंघातील नेर येथे महायुतीच्या उमेदवार ज्ञानज्योती भदाणे तसेच दुपारी एक वाजता साक्री विधानसभा मतदारसंघात महायुतीचे उमेदवार मोहन सूर्यवंशी यांच्या प्रचारार्थ सभा होणार आहे.


मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !